श्रीगोंदा-पारगाव मार्गावर भीषण अपघात; तरुणाचा मृत्यू, १ गंभीर जखमी.. बसच्या दिव्याचा अभाव आणि ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघात..

दिनांक १६ ऑक्टोबर २०२५,श्रीगोंदा:

श्रीगोंदा-पारगाव रस्त्यावर आज सायंकाळी ७:२० च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात मखरेवाडे-बोरुडेवस्ती दरम्यान भांबच्या मळ्या परिसरात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, पारगाव येथील रहिवासी असलेले आशुतोष भद्रे (वय २६) आणि मंगेश मडके (वय २२) हे दोघे तरुण मोटार सायकलवरून श्रीगोंदा येथून पारगावकडे जात होते.

त्याचवेळी शिरूरहून श्रीगोंदाकडे भरधाव वेगाने येणाऱ्या एका बससोबत त्यांची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, यात आशुतोष भद्रे याचा मृत्यू झाला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर-श्रीगोंदा बसचा एक दिवा बंद होता. तसेच, अपघाताच्या वेळी बस चालक अंधाराच्या परिसरातून जात असताना एका वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. चालकाच्या याच बेजबाबदारपणामुळे हा अपघात घडला आणि त्यात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या मंगेश मडके याला तातडीने श्रीगोंदा शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Advertise…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading