श्रीगोंदा शहरातील दहावी-बारावीच्या परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करणार.
दिनांक २७ फेब्रुवारी, श्रीगोंदा:
कै.मोतीराम गणपत बोरुडे यांचा दशक्रिया विधी सत्यशोधक पद्धतीने पार पडला यावेळेस थोर विचारवंत डॉक्टर रफिक सय्यद यांनी आपले विचार मांडले.

आपण भेदाभेद करू नका. आपण एकाच आईचे लेकर आहोत, शाळेसाठी मदत करा, असे थोर विचार त्यांनी मांडले. कै. मोतीराम गणपत बोरुडे यांच्या दोन मुलांनी आपल्या वडिलांचा दशक्रिया हा सत्यशोधक पद्धतीने झाला पाहिजेत अशी खूणगाठ मनात बांधून त्यांचा मुलगा विठ्ठल मोतीराम बोरुडे तसेच दुसरा मुलगा मारुती मोतीराम बोरुडे व नातवंडे यांनी हा आपल्या घराशेजारी शेतामध्ये पार पडला. नंतर घरासमोर शोकसभेचे आयोजन केले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अॅड. संभाजी आप्पा बोरुडे यांनी केले. सत्यशोधक दशक्रिया विधी भीमराव कोथिंबिरे व लांडगे महाराज यांनी पार पाडला. त्याच बरोबर ” हा मळा भांबाचा मळा नसून क्रांती चा मळा आहे” असे उद्गार संतोष इथापे यांनी काढले.

याप्रसंगी माजी आमदार राहुल जगताप, नवनिर्वाचित जिल्हा बँकेचे संचालक तसेच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष घनश्याम आण्णा शेलार, माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब शेलार, केशव भाऊ मगर, जिजा बापू शिंदे, संभाजी ब्रिगेडचे अरविंद कापसे, नाना शिंदे, बाळासाहेब शेलार, मुकुंद सोनटक्के, बापू माने, टिळक भोस, सतीश बोरुडे, बोरुडे परिवाराचे सर्व नातेवाईक याप्रसंगी उपस्थित होते. कोरोणाचे सर्व नियम पाळून कार्यक्रम संपन्न झाला.
स्रोत:(नाना शिंदे, संभाजी ब्रिगेड, श्रीगोंदा)
