मेंढपाळांना प्रत्येकी दहा हजारापर्यंत शासनाने मदत करावी.:आदेश शेंडगे..

दिनांक २३ जुलै,श्रीगोंदा:

महाराष्ट्र राज्यातील तमाम मेंढपाळांना प्रत्येकी दहा हजारापर्यंत शासनाने मदत करावी. अशी मागणी आदेश शेंडगे यांनी प्रसिद्धिस दिलेल्या माहितीत दिली आहे. कोरोना सदृश्य परिस्थिती मुळे शेळ्या-मेंढ्यांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झालेले आहेत. त्यामुळे मेंढपाळ बांधवांचा मेंढपाळ व्यवसाय आर्थिक संकटात सापडला असून, उदरनिर्वाहाचा प्रश्न बळावत चालला आहे.

सर्व मेंढपाळ बांधवांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. येत्या पंधरा दिवसात शासनाने मेंढपाळांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत करावी. अशी मागणी धनगर समाजाचे युवा नेते व ‘सुभेदार मल्हारराव होळकर सामाजिक युवा संघटने’चे संस्थापक आदेश शेंडगे पाटील यांनी माध्यमांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रात केली आहे.

स्रोत:(आदेश शेंडगे यांचे प्रसिद्धी पत्रक)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading