दुधाच्या धारांतून शितलच्या जीवनात पदवीचे चांदणे..

अजनुज शिवारात वडिलांची शेती घरातील माणस आजारपणाशी झुंज देताना त्रस्त! त्यामुळे क्षीरसागर परिवारासमोर अनेक आव्हाने अशा परिस्थितीत शितल शंकर क्षीरसागर या नाभीक समाजातील बहादूर मुलीने हिम्मत न हारता गायी पालन आणि दुधाच्या धारा काढून महाविद्यालयीन शिक्षण घेतले आणि दोन भावडांच्या शिक्षणासाठी हातभार लावला. शितलने विज्ञान शाखेचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण केले आहे. श्रम आणि संस्कारातून शितलच्या जीवनात पदवीचे शितल चांदणे पडले आहे.

शंकर क्षीरसागर यांना भीमा नदीच्या काठावर वडिलोपार्जित आठ एकर उस शेती संकरित गायी पालन व दुधाचा व्यवसाय करतात. शितल, पल्लवी व अक्षय या मुलाच्या शिक्षणासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. शितलचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना अक्षयने डिप्लोमाला अॅडमिशन घेतले. पल्लवी हायस्कूल मध्ये तीन मुलांचा शिक्षकांचा खर्च चालू असताना क्षीरसागर परिवारातील करती माणस आजारपणाच्या विळख्यात सापडली आणि क्षीरसागर परिवाराची आर्थिक घडी विस्कटली.

शितल ही अजनूज येथील वळणेश्वर विद्यालयाची विद्यार्थीनी असून त्याला मार्गदर्शन विद्यालयाच्या मुख्याध्यापक शिवाजीराव शेळके, वर्ग शिक्षक दिलीप काटे लाभले. बारावी नंतर पुणे येथील गरवारे महाविद्यालयात नंबर लागला पण घरची परिस्थिती व भावडांच्या शिक्षणाचा विचार करून शितलने श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात प्रवेश घेतला. पण शितलचे लक्ष गायीचे संगोपन आणि दुध व्यवसायातच! कॉलेज जीवन फक्त नावाला उरले शितलला गायी संगोपनासाठी वेळ मिळावा म्हणून प्रा.एस.पी. लवांडे यांनी शितलला मदत करण्याची भुमिका घेतली. शितल घरी गेली कि गायीला चारा, घास कापून आणणे गायी धुणे, गायीच्या दोन टाईम धारा काढणे, यामध्ये व्यस्त आणि रात्रीच्या वेळी अभ्यास करणे हा शितलचा दिनक्रम बनला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ने सन १९९६ मध्ये घेतलेल्या टी.वाय.बी.एससी च्या परिक्षेत शीतलला ७६ % गुण मिळाले.

महाविद्यालयीन शिक्षण घेताना चैनबाजी व मौजमजा करणे महाविद्यालयीन विद्यार्थीची फॅशन बनली आहे. श्रम करण्यात विद्यार्थ्यांना कमीपणा वाटतो. अशा परिस्थितीत शितलने श्रम आणि संस्कारांच्या बळावर स्व:ता पदवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण केले आणि दोन भावडांच्या शिक्षणासाठी आई वडिलांना हातभार लावला. हा शितलने वेगळा आदर्श चंगळवादी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर ठेवला आहे.

शितलने विज्ञान शाखेचे पदवीत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी एम.एस्सी. ला ऑडमिशन घेतले. असून तिची बहीण पल्लवी बी.ए. करीत असून तिचा पोलीस होण्याचा इरादा आहे. घरी आल्यानंतर शितलला शेतीतील काम स्वस्त बसू देत नाही त्यामुळे शितल जरी महाविद्यालीन शिक्षण घेत असली तरी तिचा श्रम देवतेवर मोठा विश्वास आहे. त्यामुळे शितल जीवनात निश्चितच यशस्वी होणार आहे.

रडणार नाही तर लढणार ..

मला गायीना चारा टाकणे त्यांना धुणे आणि दुधाच्या धारा काढणे ही कामे करण्यास खुप आवडतात. मी एम.एस्सी. चे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर नोकरी मिळेल अशी अपेक्षा आहे जरी नोकरी नाही मिळाली तरी रडत बसणार नाही. आधुनिक पध्दतीने शेती करणाऱ्या सुशिक्षित मुलाशी विवाह करून शेतीत करिअरकरताना मी कमीपणा बाळगणार नाही. श्रम आणि संस्कारांची पायाभरणी मजबूत झाली आहे त्यामुळे जीवनात कोणत्याही संकटावर मात करण्याची मानसिकता झाली आहे. कु.शितल शंकर क्षीरसागर,अजनुज.

स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
प्रस्तुत माहिती पुस्तक प्रकाशन वेळेची आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading