जातीयवादी नागवडे इतर समाजाला डिवचून, जर आमदारकीचे स्वप्न पाहत असतील.? तर, त्यांचे ते स्वप्न पूर्ण होणार नाही.!: शेलार..

दिनांक ९ नोव्हेंबर, श्रीगोंदा:

श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये स्वर्गीय शिवाजी (बापू) नागवडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी देशाचे माजी कृषिमंत्री शरदचंद्र पवार आले होते. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी मला माझे संचालकपद हटवल्याचे पत्र मिळाले. याबाबत जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले. आज दिनांक ९ नोव्हेंबर रोजी मढेवडगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

या पत्रकार परिषदेत सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन केशव भाऊ मगर, जिजाबापू शिंदे, ad. बाळासाहेब काकडे, वैभव पाचपुते, डॉक्टर नागवडे, (जिल्हा परिषदचे माजी सदस्य) अनिल ठवाळ, प्रशांत दरेकर, अनंता पवार, शहाजी कोरडकर, जितूशेठ मगर, रफिक भाई इनामदार सह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी बोलतांना अण्णासाहेब शेलार म्हणाले की, श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना हा खाजगीकरणाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. माझ्या आणि केशवभाऊ मगर यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेचा निकाल लागला आणि त्या संदर्भातील पत्र स्व. बापूंच्या पुतळा अनावरण कार्यक्रमच्या दुसऱ्या दिवशी मिळाले. केशवभाऊ यांचे पद घालवण्याचे धाडस त्यांना झाले नाही. माझ्यासारखा सर्वसामान्य माळी समाजाचा कार्यकर्ता त्यांच्या विरोधात बोलतो म्हणून, माझे पद घालवण्याचे काम त्यांनी केले.

पुढे बोलतांना निवडणूक थांबणार नाही आणि आमच्या शिवाय ही निवडणूक पुढेही जाणार नाही.! आम्ही सर्व मिळून ही निवडणूक मोठ्या ताकतिने पुढे नेणार असल्याचे मत शेलार यांनी व्यक्त केले. स्व. बापू यांची सहकारातील कामगिरी पाहता, त्यांच्या पुतळ्यासाठी तालुक्यातील कोणत्याही नेत्याने विरोध केला नाही. उलट शेतकऱ्यांच्या ऊस बिलांतून प्रति टन १५ रुपये तसेच, शिक्षकं व कामगारांचे पगार घेण्यात आले.

पुतळा उभारण्याचा कार्यक्रम घेत असतांना मात्र, सर्वांचा अपेक्षा भंग झाला. कारण, पुतळा अनावरण कार्यक्रमामध्ये तालुक्यातील बहुतांश नेत्यांना डावलण्यात आलं. मंचकावर फक्त नातलगांनाच बसवण्यात आलं. बापूंच्या सोबत काम करणारे निष्ठावान कार्यकर्ते एकनाथ निंबाळकर, खासेराव वाबळे, बापूराव तनपुरे, आबासो लगड, रंगनाथ बाबा पंदरकर, शिवराम आन्ना पाचपुते यापैकी किंवा त्यांच्या वारसांना सन्मानित करायचे तर सोडा, साधा नामोल्लेखही करण्यात आला नाही.

राजूदादा नागवडेंनी केलेले भाषण हे गोंधळाच होतं. कारखान्याची परीस्थिती, कारखान्याचा कारभार यावर बोलण्याऐवजी देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्यासमोर एफ आर पी बाबत चक्क खोटं बोलले.! अशा परिस्थितीत साखर कारखाना खाजगी झाल्याशिवाय राहणार नाही. कारखाना उभारणी मध्ये स्वतःच्या जमिनी विकून, डाग मोडून अनेकांनी मोलाची साथ दिली. अशा १९ हजार ५५४ सभासदांपैकी १० हजार १५४ सभासदांना मतदानापासून वंचित व अपात्र करण्याचे षडयंत्र केल. मात्र, “शेतकरी आघाडी सहकार बचाव पॅनल”चे नेते केशवभाऊ मगर, अण्णासाहेब शेलार, जिजाबापू शिंदे, ad. बाळासाहेब काकडे या नेत्यांच्या न्यायालयीन लढाईने या सभासदांना पात्र केलं आहे. असे ते म्हणाले.

उद्घाटन प्रसंगी पंचायत समितीच्या सभापती गितांजलीताई पाडळे या आरक्षित दलित समाजाच्या महिलेचे नाव नमूद कार्यक्रमातून वगळण्यात आले. त्याच बरोबर काँग्रेसचे (तालुकाध्यक्ष) दीपकराव भोसले, राष्ट्रवादीचे (तालुकाध्यक्ष) हरिदास आबा शिर्के व शिवसेनेचे बाळासाहेब दुतारे या व्यक्तींची नावे जाणीवपूर्वक टाळण्यात कमीपणा वाटला का.? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

इतर समाजाला डिवचून, नागवडे आमदारकीचे स्वप्न पाहत असतील तर, त्यांचे ते स्वप्न पूर्ण होणार नाही.! बापुं नंतर आपण चालवलेला कारखाना आणि त्यात केलेला भ्रष्टाचार, हा पुतळा अनावरणाच्या निमित्ताने मोठ्या व्यक्तीचा आड दडण्याचा कार्यक्रम होता. असे या पत्रकार परिषदेत नमूद करण्यात आले. The racist Nagwade may be dreaming of becoming an MLA by alienating other communities.? So, their dream will not come true.!: Shelar ..

स्वतःचे खासगी कारखाने, स्वतःच्या कंपन्या, स्वतःची संपत्ती, स्वतः केलेला भ्रष्टाचार झाकण्यासाठी जिल्ह्यातील व राज्यातील मोठे नेते या ठिकाणी आणले. मुंबईला जाऊन, त्यांचे पाय धरले, काही करून मला वाचवा आणि माझ्या या कार्यक्रमाला या.! अशी विनवणी केली. आलेल्या एकाही मोठ्या नेत्याच्या व पदाधिकाऱ्यांचा तोंडून स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांच्या वारसदारांच्या ताब्यात कारखाना द्यावा.. असे वाक्य आले नाही.. या कारखान्याची वाटचाल खाजगीकरणाकडे चालली आहे. ती थांबवणे काळाची गरज आहे. असे मत आण्णासाहेब शेलार, केशवभाऊ मगर यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.

केशव मगर यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी कारखान्याची परिस्थिती, सद्यस्थिती आणि सभासद, सर्वसामान्य शेतकऱ्यांबरोबर होणाऱ्या पिळवणूकचे वर्णन केले. सावकारीच्या प्रकाराला कंटाळून सहकाराचं तत्वज्ञान पुढे आलं. स्वर्गीय बापूंनी पुढे केलेल्या सहकाराच्या प्रक्रियेला वाढवण्या ऐवजी तुम्ही खाजगी संस्था, खाजगी कारखाने काढता..! हे कशासाठी.? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

स्रोत:(पत्रकार परिषद)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading