“महाआवास घरकुल अभियान” यशस्वी करण्यासाठी सर्व घरकुले तात्काळ पुर्ण व्हावीत: गटविकास अधिकारी प्रशांत काळे..

दिनांक ३ एप्रिल, श्रीगोंदा:

महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागामार्फत घरकुल बांधकाम पुर्ण करण्यासाठी सुरु असलेले “महाआवास अभियान” आपल्या तालुक्यातही प्रभावीपणे राबवले जात आहे. ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थींसाठी सुरू असलेले प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना या योजनाअंतर्गत मंजुर असलेली सर्व घरकुले तात्काळ पुर्ण करणेबाबत तालुक्यात नियोजन करण्यात आले आहे.

घरकुल बांधकामासाठी जागा नसलेल्या लाभार्थींना जागा उपलब्ध करणे, अपुर्ण बांधकामे पुर्ण करणे, अनुदान हप्ते तात्काळ लाभार्थींना अदा करण्यासाठी सर्व ग्रामपंचायत पातळीवर पालक अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, तालुका स्तरावरील सर्व यंत्रणाच्या मदतीने घरकुले पुर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

या अभियानाचे निमित्ताने सर्व योजनांचे मंजुर घरकुल लाभार्थीनां आवाहान करण्यात आले आहे की, आपण तात्काळ घरकुल बांधकाम पुर्ण करावीत, घरकुल बांधकामासाठी टप्पानुसार मिळणारे अनुदान तात्काळ लाभार्थींना अदा करण्यात येईल.

https://bit.ly/bspmycityshrigonda

श्रीगोंदा तालुक्यातील सर्व पदाधिकारी, अधिकारी व घरकुल लाभार्थीनीं महाआवास अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी व सर्व घरकुले अभियान कालावधीत पुर्ण करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहान गटविकास अधिकारी श्री. प्रशांत काळे यांनी केले आहे.

स्रोत:(पंचायत समितीचे प्रसिद्धी पत्र

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading