दिनांक १७ जून,श्रीगोंदा:
दिनांक ६ व ७ जून २०२० रोजी श्रीगोंदा जामखेड रोडवरील चंद्रमा पेट्रोल पंपाशेजारी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम चालु होते.नमुद काम पाऊस चालु असताना किंवा भरपुर पाऊस झाला होता अशा कालखंडामध्ये चालू असल्याने उपस्थितांनी सामाजीक माध्यमातून नमूद ठिकाणच्या कामाविषयी चित्रीकरण करून आक्षेप घेतला. हे सर्व श्रीगोंदा वासियांना माहित झाले आहे.या कामाच्या चौकशीसाठी नितीन रोही यांनी श्रीगोंदा नगरपालिकेला निवेदन सादर केले असून,या कामांची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.दिलेल्या कालावधीत माहिती न दिल्यास किंवा कामाविषयी खुलासा न केल्यास,तहसिल कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सविस्तर असे की,प्रशासनामार्फत चालू असलेल्या या रसत्याचे काम अशा पद्धतीने पावसात चालू असल्याने त्याच्या दर्जा आणि गुणवत्तेवर परिणाम होणार हे माहित असतानाही संबधित ठेकेदार, न.पा इंजिनीअर तसेच मुख्याधिकारी, नगरध्यक्ष, नगरसेवक, यांना दिसत असून किंवा समजले असूनही नमूद काम पूर्णत्वाला नेणे गैरसंविधानिक असल्याने या कामाचे अंदाजपत्रक देण्यात यावे, तसेच चंद्रमा पेट्रोलपंपापुढे केलेल्या कामाचा दर्जा आणि गुणवत्ता कशी ठरवणार ? या विषयी खुलासा करावा,जनतेतुन कर स्वरुपात मिळालेल्या पैशातून तसेच शासनामार्फत उपलब्ध झालेल्या निधिचा अशा पद्दतिने जर गैरवापर होत असेल. तर, हे काम करण्याची पद्दत निषेधार्य आहे.असेही त्यात नमूद केले आहे.
श्रीगोंदा नगरपालिकेमार्फत जनतेच्या पैशाची अनधिकृत कामांवर होणारी उधळपट्टी थांबवण्यासाठी तसेच श्रीगोंदा जामखेड रोडवरिल चंद्रमा पेट्रोल पंपाशेजरी चालू असलेल्या त्या नमूद रसत्याच्या कामाचे अंदाजपत्रक आपल्या प्रशासनामार्फत सादर करण्यात यावे व नमूद १७ रास्त्यांच्या कामांचे अंदाज पत्रकासह दर्जा आणि गुणवत्तेविषयी लेखी खुलासा सादर करावा. अन्यथा,स्थानिक प्रशासनाचे मुख्य तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर वरील विषयासंदर्भात दिनांक १३/०७/२०२० नंतर अचानक कधीही आंदोलनाची भूमिका घेत प्राणांतिक उपोषण सुरु करणार असून, तत्पूर्वी प्रशासनाने वरील सर्व विषयांचा खुलासा करावा अशी भूमिका नितीन रोही यांनी निवेदनात मांडली आहे.
सदर निवेदन देतांना नितीन रोही राजेंद्र पोकळे, अजित गायकवाड, माऊली भैलूमे, गुरु गायकवाड, नितीन कांबळे, विश्वास सुडगे, अभय गायकवाड व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
