सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र सुपेकर यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश..
दिनांक २७ जुलै,श्रीगोंदा:
आज दिनांक २७ जुलै रोजी वंचित बहुजन आघाडी अहमदनगरचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड.डॉ.अरुण जाधव यांच्या जामखेड येथील कार्यालयात श्रीगोंद्यातील सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र सुपेकर यांनी आपले सहकारी प्रल्हाद हजारे (अभियंता, बांधकाम विभाग), लक्ष्मण कोथंबिरे, केरबा सुपेकर, कांतीलाल कोकाटे (तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी श्रीगोंदा) आदींच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे अरुण जाधव यांनी प्रसिध्दी माध्यमांना दिली आहे.
यावेळी जाधव यांनी मच्छिंद्र सुपेकर यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करत त्यांचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर सत्कार केला.मच्छिंद्र सुपेकर हे बहुजन समाजातील माळी समाजाचे नेते असून,श्रीगोंदा मतदार संघात माळी समाजाचे ४० हजार मतदान असल्याने,येत्या विधानसभा निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार असल्याचे जाधव यांनी नमूद केले आहे.यावेळी जामखेड/कर्जत विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड यांच्यासह बापु ओहोळ,सचिन भिंगारदिवे,डॉ.संजय राऊत,वडार समाजाचे नेते विकास म्हस्के, आदिवासी समाजाचे नेते विशाल पवार,वैजिनाथ केसकर,राकेश साळवे,संतोष गर्जे,सागर भांगरे आदी उपस्थित होते.
वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी काम करण्याची इच्छा असुन,आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पुढील वाटचाल करणार असल्याचे सुपेकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना नमूद केले आहे.वरिष्ठांच्या सूचनेनुसार येणारी विधानसभा लढविण्याची तयारी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.मोठ्या प्रमाणात समाज फुले,शाहू आंबेडकरी विचारांची कास धरीत असून,या सर्व समाज बांधवांसाठी आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करणार आहोत असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले आहे.