कोरोना संक्रमनात केलेल्या उल्लेखनीय लोकसेवेबद्दल, श्रीगोंदा नगरपरिषदेकडून सन्मानपत्र..

दिनांक २५ जून, श्रीगोंदा:

तालुका कार्यक्षेत्रात कोरोना प्रादुर्भावात आपल्या जिवाची पर्वा न करता कर्तव्यावर असलेल्या आरोग्य, पोलीस, महसूल, नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, कोविड केअर सेंटर चालक सह पत्रकारांचा लोकसेवा/समाजसेवेबद्दल नगरपालिकेच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. आपत्तीत केलेल्या कामाची पावती दिल्याने अनेकांनी श्रीगोंदा नगरपालिकेने आमच्या कार्यासाठी पाठिवर थाप टाकल्याचे मनोगतात नमूद केले.

Covid-19 प्रादुर्भावामध्ये आरोग्य, सफाई कामगार, पोलीस व महसूल यंत्रणेवर अतिरिक्त भार येत, सर्वसामान्य नागरिकांच्या संरक्षणाची भरीव जबाबदारी येऊन पडली होती. या प्रक्रियेमध्ये उपलब्ध संसाधन व तुटपुंजा व्यवस्थेमध्ये स्थानिक स्तरावर काम पूर्ण केले गेले. Certificate of Honor from Shrigonda Municipal Council for outstanding public service in Corona Transition.

या सर्व प्रक्रियेमध्ये पत्रकारांनीही मोलाचे योगदान दिल्याने, त्यांच्या समाज सेवेबद्दल सन्मान होणे गरजेचे असल्याचे गटनेते व माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी यावेळी नमूद केले. या संकल्पनेतून नपा प्रशासन प्रमुख मुख्याधिकारी मंगेश देवरे तसेच, (नगराध्यक्ष) शुभांगी ताई पोटे व सभेच्या सदस्यांनी एकत्रित येऊन, कोरोना आपत्तीमध्ये कर्तव्यावर असलेल्या प्रशासकीय कर्मचारी, कामगार, लोकसेवक, पत्रकार तसेच स्वतःच्या मृत्यूचे भय न बाळगता इतरांच्या दुःखामध्ये सहभागी होत, त्यांना कोरोना संक्रमणातून मुक्त करण्यासाठी कॉविड केअर सेंटरच्या माध्यमांतून मदतीसाठी हात देणारे, संचालक व कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याचे ठरवले. त्यानुसार या सेवकांचा आज सन्मान करत, त्यांच्या कामाची पावती म्हणून सन्मानपत्र देण्यात आले.

शहरातील तुळशीदास मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमांमध्ये श्रीगोंदा नगरपालिकेचे सर्व कर्मचारी, पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर (प्रांताधिकारी) स्वाती दाभाडे (मॅडम), (तहसीलदार) प्रदीप पवार, (पोलीस निरीक्षक) रामराव ढिकले, (गटनेते) मनोहर दादा पोटे, (नगराध्यक्ष) शुभांगीताई पोटे, (उपनगराध्यक्ष) रमेश लाढाने, (नगरसेवक) बापूशेठ गोरे, सतीश मखरे, संग्राम घोडके, अशोक खेंडके, संतोष क्षीरसागर, प्रशांत गोरे, (पोलीस उपनिरीक्षक) विठ्ठल पाटील, (सहा. पोलीस उपनिरीक्षक) अनिल भारती, (पोकॉ) देवकाते दादा, घोळवे दादा, मिराताई शिंदे यांचेसह डॉक्टर्स व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

श्रीगोंदा नगर परिषद मार्फत कोरोना संक्रमण काळात कोरोना विषयी जनजागृती करत लोकांपर्यंत आजारा विषयी योग्य माहिती पोचवणे व स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, सतत कार्य करत राहत, तालुक्यातील जनतेला सहकार्य केल्याने, हे सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी सन्मानप्राप्त मान्यवरांच्या वतीने आभार प्रदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन (पत्रकार) विशाल चव्हाण यांनी केले. तर, आभार (उपनगराध्यक्ष) रमेश लाढाने यांनी मानले.

स्त्रोत:(आयोजित कार्यक्रम)

https://bit.ly/bspmycityshrigonda

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading