कोरोनात सामान्यांची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी चिकन ८०/- रुपये प्रति किलोने विक्री.. आतिकभाई कुरेशी यांचा सामाजिक उपक्रम..

दिनांक २३ मे, श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरासह तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमामुळे सर्वश्रुत असलेले आतिकभाई कुरेशी यांनी आता कोरोना प्रादुर्भाव कालखंडामध्ये सर्वसामान्य माणसाच्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण व्हावी, यासाठी चिकन ८०/- रुपये प्रति किलो दराने विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी त्यांच्या गरीब नवाज चिकन शॉपमध्ये याचा फलक लावून, सर्वांना लाभ घेण्याचे आव्हान केले आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

आतिकभाई कुरेशी यांच्या गरीब नवाज चिकन सेंटरमध्ये लॉकडाऊन काळात सामान्य माणसाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोरोना संक्रमनात सामाजिक उपक्रम म्हणून, चिकन खरेदी व कंपनी भावात विक्री करण्याचे ठरवले आहे. या प्रादुर्भावात जास्त प्रमाणात प्रथिने घेण्यासाठी अंडी, मासे, चिकन यावर लोक तुटून पडत असतांना, आणि एकीकडे या सर्व बाबींचे रेट वाढवून त्याचा व्यवसाय करू पाहणाऱ्या प्रक्रियेमध्ये सामाजिक भान जपत जनहितार्थ आतिकभाई यांनी हा उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. chicken-at-rs-80-per-kg-to-increase-the-immunity-of-common-people-in-corona-atikbhai-qureshis-social-initiative

यापूर्वीही त्यांनी लॉकडाऊनमध्ये उपेक्षित, वंचित, निराधार व गरजू लोकांना एक महिन्याचे किराणा साहित्य वाटप केले आहे. “पवित्र रमजान ईद” सनानिमित्ताने मिष्ठान्न किट व तालुक्यातील कोविड केअर सेंटर्सला आर्थिक मदत तसेच औषध, सॅनिटायझर व मास्क वाटप केले आहे. अशा वेगवेगळ्या समाज कल्यानांच्या उपक्रमांत अग्रणी राहत, आपली सामाजिक भूमिका पार पाडण्यात आतिकभाई कुरेशी तालुक्यातील एक दानशूर व्यक्ती म्हणून चर्चेत येत आहेत. अडचणीत सर्वसामान्य, वंचित, गरजूनां मदत केल्याने, सर्व सामान्य माणसांकडूनही आतिकभाई कुरेशी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडत आहे.

स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading