दिनांक २५ मार्च २०२५,श्रीगोंदा:
मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना उत्साहात साजरा केला जात असून, उपवास आणि सामूहिक इफ्तारचा मोठा महत्त्व आहे. सामाजिक सलोखा आणि धार्मिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या वतीने श्रीगोंदा येथील जामा मशीद येथे भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील ढवळे, जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक मान्यवर आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे यांनी मानवता हाच खरा धर्म असल्याचे सांगून सर्वांनी एकत्र येऊन बंधुभावाने राहण्याचा संदेश दिला. त्यांनी कट्टरतावाद कुठल्याही समाजासाठी घातक असल्याचे सांगत सर्वधर्मसमभावाचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी सुनील ढवळे यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत त्यांचे मन जिंकले. तसेच तालुकाध्यक्ष वैभव वनशिव यांनी आपल्या कवितेमधून मनोगत व्यक्त करून सर्वांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाचे आभार रिजवान भाई यांनी मानले.

या इफ्तार पार्टीत संभाजी ब्रिगेडचे संघटक गणेश पारे, जिल्हा संघटक सागर हिरडे, जिल्हा सचिव हेमंत हिरडे, तालुकाध्यक्ष वैभव वनशिव तसेच मुस्लिम धर्मगुरू शेख मौलाना आत्तार आणि मुस्लिम समाजाचे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते.

संभाजी ब्रिगेडच्या या सामाजिक ऐक्य वाढवणाऱ्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. समाजाने एकमेकांच्या धर्माचा सन्मान राखत राष्ट्रीय एकात्मतेसाठी योगदान द्यावे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
स्त्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Advertise..
