कर्मवीर भाऊराव पाटलांच्या उपस्थितीत,जनता विद्यालयाची स्थापना करणाऱ्या,शिवराम आण्णा पाचपुतेंचे निधन..

शिवराम आण्णा पाचपुते यांच्या विषयी..

श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याची पहिली निवडणूक सन १९७० मध्ये झाली. शिवाजीराव (बापू) नागवडे चेअरमन झाले आणि शिवराम (आण्णा) पाचपुते व्हाईस चेअरमन झाले. त्यानंतर सन १९७३ च्या निवडणुकी नंतरही बाप्पू आणि आण्णा ही जोडी पुन्हा चेअरमन – व्हाईस चेअरमन झाली. सन १९७८ च्या तिसऱ्या निवडणुकीनंतरही बाप्पू आणि आण्णा पुन्हा चेअरमन- व्हाईस चेअरमन झाले. कालकथीत शिवराम (आण्णा) हे सन १९७० पासून दिनांक १५ जून १९८४ पर्यंत १४ वर्ष श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन होते.

शिवराम (आण्णा) रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी चे सदस्य होते. सन १९५६ मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील काष्टी येथे आले होते. त्यावेळी शिवराम (आण्णा) यांनी पुढाकार घेऊन काष्टी येथे जनता विद्यालयाची स्थापना केली. जून १९५६ पासून हे विद्यालय वाढविण्यामध्ये अण्णांचा सिंहाचा वाटा आहे.

शिवराम (आण्णा) पाचपुते हे दिनांक २६ ऑक्टोबर १९६३ ते दिनांक ११ फेब्रुवारी १९६४ अखेर श्रीगोंदा पंचायत समितीचे दुसरे सभापती होते. श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. अण्णा यांचे दिनांक ३० मे २०२० रोजी वयाच्या १०२ व्या वर्षी दुःखद निधन झाले व तालुक्यातील एक कार्यकुशल व्यक्तिमत्व हरपले. आण्णांना श्रीगोंदा वाशीयांसह दरेकर परिवाराच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

प्रा.तुकाराम दरेकर

(संकलित)..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading