दिनांक २८ मे २०२४, श्रीगोंदा/पुणे:
सध्या पुणे येथे चालू असलेल्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये श्रीगोंदयाचा सुपुत्र आणि इयत्ता ९ विच्या वर्गात शिकत असलेला प्रज्वल सुनिल ढवळे याने नुकतीच ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले.
Prajwal Sunil Dhavale won gold medal in national kick boxing competition.
प्रज्वल हा राजधानी हॉटेल आणि संगम ऍग्रो सर्व्हिसेसचे मालक तसेच, श्रीगोंदा तालुका सिड्स पेस्टीं अँड फर्टि डिलर्स असोसिएशनचे तालुकाध्यक्ष श्री. सुनिल ढवळे यांचा सुपुत्र आहे.
या स्पर्धेमध्ये २७ राज्यांतील १८०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. लाईट कॉन्टॅक्ट आणि पॉईंट फाईट या दोन्ही प्रकारांमध्ये त्याने दोन सुवर्णपदकं मिळवून सुवर्ण पदकाचा डबल धमाका केला आहे. ही कामगिरी करत प्रज्वलने श्रीगोंदा तालुक्याचे नाव देशपातळीवर पोहचवले आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील या यशानंतर त्याची जागतिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
त्याच्या या कामगिरीमध्ये संजय आनंदकर स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा संजय आनंदकर सर, मास्टर जयेश आनंदकर सर आणि सिद्धेश आनंदकर सर यांचा मोलाचा वाटा आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल बबन दादा पाचपुते, राहुल दादा जगताप, घनश्याम अण्णा शेलार, राजेंद्र दादा नागवडे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच, सर्वच स्तरावरून प्रज्वलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
