कर्जत तालुक्यातील तीखी ग्रामपंचायत प्रकरणी संभाजी ब्रिगेडचा तक्रारदार नामदेव दळवी यांना जाहीर पाठिंबा..

दिनांक १ जुलै २०२४, श्रीगोंदा:

कर्जत तालुक्यातील तीखी ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून संभाजी ब्रिगेड संघटनेने तक्रारदार नामदेव दळवी यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

या प्रकरणी, तीखी ग्रामपंचायतीतील ग्रामसेवकांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात ग्रामपंचायत सदस्य नामदेव दळवी यांनी ग्रामविकास विभागाला ऑनलाइन तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, जिल्हा परिषद अहमदनगर यांनी कर्जत गटविकास अधिकारी यांना ग्रामसेवक श्री. तात्यासाहेब धोबे यांच्यावर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

या चौकशीला पारदर्शक आणि निष्पक्षतेची अपेक्षा तक्रारदार आणि स्थानिक नागरिकांना आहे. संभाजी ब्रिगेडच्या शेतकरी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. संग्राम भैय्या देशमुख आणि कर्जत तालुका अध्यक्ष श्री. नवनाथ धनवे यांनी तक्रारदाराच्या पाठिंब्याचे आश्वासन दिले आहे. चौकशीमध्ये काही त्रुटी आढळल्यास किंवा योग्य कारवाई न झाल्यास जिल्हा परिषद अहमदनगर येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही, याची खंत संभाजी ब्रिगेडने व्यक्त केली आहे. त्यामुळे या चौकशीद्वारे दोषींवर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

जाहिरात…

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading