दिनांक २६ नोव्हेंबर २०२५, श्रीगोंदा:
विकास कामांच्या नावाखाली नगरसेवकांचे भरणारे खिसे आणि भ्रष्टाचार. ‘आता लोक कंटाळले आहेत.
श्रीगोंदा शहर (Shrigonda City) आणि परिसरातील नागरिकांना पुन्हा एकदा वेड्यात काढण्याचा धंदा श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीच्या (Shrigonda Nagar Palika Election) निमित्ताने सुरू झाला असल्याची तीव्र चर्चा नागरिकांमध्ये आहे.
निवडणुकीत तेच तेच, जुने आणि शहराला अनेक वर्षे भकास करणारे चेहरे पुन्हा उमेदवारी घेऊन समोर येत असल्याने श्रीगोंदावासीयांनी ‘सावधान’ राहण्याचे आवाहन सुज्ञ नागरिक करत आहेत.
आत्मपरीक्षण करा, भावनिक होऊ नका!
शहरातील नागरिकांनी भावनिक न होता, एकदा आत्मपरीक्षण करून योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे. आपल्याला श्रीगोंदा शहराचा विकास हवा आहे की, अनेक वर्षे शहर विकासापासून वंचित ठेवणाऱ्या उमेदवारांना पुन्हा संधी द्यायची..? याचा विचार करण्याची गरज आहे.
मागील पाच पंचवार्षिक निवडणुकांमध्ये ज्येष्ठ नेते वेगवेगळ्या चिन्हांवर निवडून आले, मात्र ज्या पाणी योजनांची (साकळाइं, डिंबे, माणिक डोह, कुकडी) आणि आता MIDC ची घोषणा झाली, त्यापैकी एकही योजना परिपूर्ण झाली आहे का? असा रोकडा सवाल नागरिक विचारत आहेत.

या नेत्यांनी दुसऱ्या पक्ष/संघटनांची ताकद वापरून स्वतःला शक्तिशाली केले, मात्र शहराच्या विकासासाठी त्यांनी कधीच राजकीय भूमिका ठाम ठेवली नाही, अशी टीका सातत्याने त्यांच्यावर होत आली आहे.
सध्याच्या निवडणुकीत उभे असलेले बहुतांश उमेदवार जुनेच चेहरे आहेत, ज्यांच्या कार्यकाळात या शहराचे ‘वाळवंट’ झाले. शहरात नगरपालिका विकास कामांच्या नावाखाली ‘वाटोळं’ करण्याचे काम याच मंडळींनी केले, असा नागरिकांचा आरोप आहे.
काहींनी तर रस्ते खाल्ले, ज्यामुळे संपूर्ण शहर खड्ड्यात गेले आहे.. Bgrl आणि मोबाईल कंपन्यांसाठी वारंवार बनवलेले रस्ते खोदण्यात आले. कंपन्यांनी दिलेला ‘मेंटेनन्स’चा पैसा कोणाच्या खिशात गेला.? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
निवडणुका पैशांच्या जोरावर आणि जात-धर्म यांच्यात वाद लावून लढण्याची प्रक्रिया अमलात आली आहे, ज्यामुळे सामान्य माणूस अनेक दशके फसत राहिला.
आज श्रीगोंदा शहरातील नागरिक म्हणून रोज नगरपालिका नगरसेवकांच्या पातकाचे भोग भोगावे लागत आहेत. शहरवासीयांची दिनचर्या धुळीचा आणि खड्ड्यांतून प्रवास… अंधारलेल्या गल्या आणि रस्ते (पथदिव्यांचा अभाव)..अशुद्ध पाणी पुरवठा.. विकास कामांच्या नावाखाली नगरसेवकांचे भरणारे खिसे आणि भ्रष्टाचार. ‘आता लोक कंटाळले आहेत.
आम्हाला हवे आहे?
- ✅ शुद्ध पाणी
- ✅ खड्डे मुक्त रस्ते
- ✅ वीज आणि पथदिवे
- ✅ वाड्या वस्त्यांवरील मूलभूत सुविधा…
- पुन्हा टक्केवारी आणि भ्रष्टाचार करून ही यंत्रणा शहराची बरबादी करतील, या भीतीमुळे श्रीगोंदा शहरातील तमाम नागरिकांनी सावध व्हावे आणि योग्य निर्णय घ्यावा असे आवाहन जागरूक नागरिक करत आहेत. पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही, याची जाणीव ठेवून मतदान करा.
श्रीगोंदा शहरवासीयांनो, जुन्या भ्रष्टाचारी नेतृत्वाला पुन्हा संधी देणे म्हणजे शहराला आणखी भकास करण्याला परवानगी देणे आहे. विकासासाठी सक्षम आणि नवे नेतृत्व निवडा!
स्रोत:(अधिकृत माहिती)
