दिनांक ३० जुलै २०२५,श्रीगोंदा:
श्रीगोंदा येथील रहिवासी राजेंद्र तुकाराम काळे (वय ५६) यांचे बुधवारी सकाळी दुःखद निधन झाले. गेल्या सहा महिन्यांपासून ते कोमात होते. चिखलीजवळ झालेल्या मोटारसायकल अपघातानंतर त्यांची प्रकृती गंभीर होती.
त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. अपघातानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे अखेर बुधवारी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. काळे कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्यासाठी अनेकांनी श्रद्धांजली वाहत सहवेदना व्यक्त केल्या आहेत.
स्रोत:(अधिकृत माहिती)
