घोडचे उन्हाळी आवर्तन चालु आवर्तनामध्येच: आमदार बबनराव पाचपुते.

दिनांक २४ एप्रिल,श्रीगोंदा:

घोड धरणातुन चालु आवर्तन बऱ्यापैकी संपत आलेले आहे. सर्वत्र पाणी पोहोचले आहे. हे आवर्तन लवकरच बंद होणार आहे, असे समजले आहे. तसेच, पुढील आवर्तन उशीरा सोडल्यास आवश्यक पाणी साठा आवर्तन पुर्ण करणेसाठी कमी पडणार आहे. ही वस्तुस्थीती असून, यासाठी चालु आवर्तनामध्येच जर पुढील दुसरे आवर्तन सोडले. तर, धरणातुन वाया जानारे अंदाजे ३०० एमसीएफटी पाणी वापरात आणता येवू शकते.

कमी पाण्यामध्येही काटकसरीणे वापर करुण पुढील आवर्तन घेता येवू शकते. याप्रमाणे यापूर्वी २ वेळेस चालु आवर्तनामध्ये दुसरे आवर्तन सोडुन कमी पाण्यामध्ये आवर्तन घेतलेले आहे. या आवर्तनामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. याबाबत कालवा सल्लागार समितीमध्ये निर्णय घेणेबाबत नामदार जयंतजी पाटील साहेब जलसंपदा मंत्री, श्री. वि. गि. राजपुत साहेब – मुख्य अभियंता (विप्र) जलसंपदा विभाग, पुणे, श्री. ह.तु. धुमाळ साहेब – अधिक्षक अभियंता, कुकडी सिंचन मंडळ, श्री. स्वप्निल काळे – कार्यकारी अभियंता, कुकडी श्रीगोंदा यांचेकडे मागणी केलेली आहे. तसेच आमदार श्री. अशोक बापु पवार (शिरुर, जि. पुणे) आणि आमदार श्री. रोहिद दादा पवार (कर्जत – जामखेड, अहमदनगर) यांचेशी फोनद्वारे चर्चा झालेली आहे. (Summer cycle of horses in the current cycle: MLA Babanrao Pachpute.) याप्रमाणे दिनांक २३ एप्रिल रोजी झालेल्या (झुम बैठक) कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये ही मागणी एकमुखाने सर्वांनी मान्य करुन, चालु आवर्तनामध्येच दुसरे उन्हाळी आवर्तन सोडणेस मान्यता देण्यात आलेली आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

या बैठकीसाठी आमदार श्री. बबनराव पाचपुते दादा, आमदार श्री. रोहित दादा पवार (कर्जत – जामखेड) आमदार श्री. अशोक बापु पवार (शिरुर, पुणे), श्री. स्वप्निल काळे कार्यकारी अभियंता, कुकडी श्रीगोंदा आणि त्यांचे उप कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

स्त्रोत:(प्रसिद्धीपत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading