ढोरजा, भानगाव व कोथूळ गावाला प्रत्येकी एक दिवस तलाठी उपलब्ध करावा..

दिनांक ३ मार्च (ढोरजा,श्रीगोंदा):

तालुक्यातील ढोरजा, भानगाव व कोथूळ येथील तलाठी संतोष सोबले हे आठवड्यात फक्त २ दिवस हजेरी लावतात. त्यामुळे लोकांचे कामकाज पूर्ण होत नाही. ‘कोविड १९’ विषाणूचा पादुर्भाव श्रीगोंदा तालुक्यामध्ये वाढत आहे. तलाठी आठवड्यातुन दोन दिवस येत असल्याने लोकांची मोठया प्रमाणात गर्दी होत आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

लोकांची कामं वेळेत होत नसून, परिणामी लोकांची गैरसोय होत, ‘कोविड १९’ ची काळजी म्हणून, तलाठयाने नमूद ठिकाणी आडवड्यातून १ दिवस भेट देऊन तेथील कामकाज पाहावे. अशी मागणी ढोरजा येथील ग्रामपंचायत सदस्य शिवराय व्यवहारे तसेच, ढोरजा व कोथूळ येथील ग्रामस्थांनी तहसीलदार प्रदीप पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

स्रोत:(प्रमोद उजगरे,ढोरजा)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading